लातूर : कचऱ्यात सापडलेली लाखमोलाची अंगठी ग्राहकाला परत
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर शहराच्या नांदेड रोडवरील एका हॉटेलमधील कचऱ्यात पडलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी त्यांनी ग्राहकाला परत केली आहे. ​ अक्षय रेड्डी हे ग्राहक हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर ते घाईगडबडीत
लातूर : कचऱ्यात सापडलेली लाखमोलाची अंगठी ग्राहकाला परत


लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर शहराच्या नांदेड रोडवरील एका हॉटेलमधील कचऱ्यात पडलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी त्यांनी ग्राहकाला परत केली आहे.

​ अक्षय रेड्डी हे ग्राहक हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर ते घाईगडबडीत घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, हातातील सोन्याची अंगठी कुठेतरी गळून पडली आहे. त्यांनी तत्काळ हॉटेल मालक यांना फोन करून अंगठीबद्दल विचारणा केली.

​या प्रकारानंतर हॉटेलमधील कामगारांना सोबत घेऊन अंगठीची कसून शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला ती कुठेच सापडली नाही. मात्र, काही वेळाने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या राहुल कसबे या कर्मचाऱ्याला ती मौल्यवान अंगठी जमा केलेल्या कचऱ्यामध्ये मिळून आली. कोणताही विलंब न करता, ती अंगठी संबंधित ग्राहकाला परत केली.

​या अंगठीची किंमत साधारणतः एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. लाखमोलाची अंगठी परत मिळाल्याने ग्राहकाला मोठा दिलासा मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande