लातूर : अहमदपूरच्या बालाजी रेड्डी यांची सेंद्रिय केळी इराकच्या बाजारात
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि प्रयोगशील शेतकरी बालाजी रेड्डी यांनी कृषी अधिकारी केळी लागवडीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या शेतात पिकलेली ''G9'' वाणाची उच्च प्रतीची केळी थेट सातासमुद्
अ


लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि प्रयोगशील शेतकरी बालाजी रेड्डी यांनी कृषी अधिकारी केळी लागवडीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या शेतात पिकलेली 'G9' वाणाची उच्च प्रतीची केळी थेट सातासमुद्रापार इराकला निर्यात झाली आहे.

​बालाजी रेड्डी यांनी आपल्या एका एकर शेतीत ५x६ फुटांवर ३,००० केळी रोपांची लागवड केली. त्यांनी सुरुवातीपासूनच रासायनिक खतांना फाटा देत केवळ जैविक पद्धतीने नियोजन केले. ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे, गाईचे शेणखत, गोमूत्र फवारणी, ठिबकद्वारे गोमूत्र आणि जीवामृतचा वापर हे त्यांच्या यशस्वी शेतीचे रहस्य आहे. या सेंद्रिय नियोजनामुळे बागेत कुठेही करपा किंवा कोणताही रोग आला नाही, परिणामी बाग आजही हिरवीगार आहे. योग्य पोषण मिळाल्याने एकही झाड मोडून पडले नाही आणि सर्व केळी एकसमान वाढली. तसेच, वेळोवेळी केलेल्या तण नियंत्रणामुळे बागेत रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. विशेष म्हणजे, वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी गजराज गवताची लागवड केली, ज्यामुळे उष्ण लहरी आणि वाऱ्यामुळे होणारे नुकसान टळले.

​लागवडीपासून अवघ्या सात महिन्यांत केळीला वादी आली आणि दहा महिन्यांत केळी विक्रीसाठी तयार झाली. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वादी चांगली पडली आणि घडांची संख्याही चांगली मिळाली. घडांचे वजन साधारणपणे २० ते २२ किलो आले.

या पहिल्याच प्रयत्नात त्यांची केळी निर्यात झाली. स्थानिक बाजारात ८ ते ९ रुपये प्रति किलो दर मिळत असताना, निर्यात झाल्यामुळे त्यांना १७ ते १८ रुपये प्रति किलो इतका दुप्पट दर मिळाला आहे. अंदाजे लागवडीपासून काढणीपर्यंत १,५०,००० रुपये खर्च आला असून, अपेक्षित ९० टन उत्पादनातून १७,००० रुपये प्रति टन दराने त्यांना १५,३०,००० रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. या यशामुळे अहमदपूरची केळी सातासमुद्रापार इराकला पोहोचली आहे, याचा आनंद आणि अभिमान त्यांना वाटतो.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande