गाझामध्ये रक्तपात सुरूच राहिला, तर त्यांच्या लढवय्यांना ठार मारले जाईल - ट्रम्प
वॉशिंग्टन , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे गाझामधील परिस्थिती सध्या तात्पुरती शांत दिसत आहे. गाझा शांतता कराराचा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी अनेक गंभीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आ
- ट्रम्प


वॉशिंग्टन , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे गाझामधील परिस्थिती सध्या तात्पुरती शांत दिसत आहे. गाझा शांतता कराराचा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी अनेक गंभीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. दरम्यान, गाझामध्ये सार्वजनिकरित्या लोकांची हत्या करण्यात आली आहे, आणि यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हमासला कठोर इशारा दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “जर गाझामध्ये रक्तपात सुरूच राहिला, तर आमच्याकडे त्यांच्या लढवय्यांना ठार मारण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.” ट्रम्प यांचा हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा गेल्या आठवड्यात युद्धविराम लागू झाल्यानंतर त्यांनी तिथल्या अंतर्गत हिंसाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता.

याआधीही ट्रम्प यांनी हमासला त्यांच्या शस्त्रास्त्रांचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. “जर त्यांनी असं केलं नाही, तर अमेरिका कारवाई करेल”, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. ट्रम्प म्हणाले होते की, “मध्यस्थांच्या माध्यमातून हा संदेश हमासपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. जर त्यांनी शस्त्रास्त्र खाली टाकली नाहीत, तर आम्ही ती काढून घेऊ आणि कदाचित तेही लवकर, हिंसक मार्गाने.”

दरम्यान जरी इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार झाला असला, तरी हमासचे निरस्त्रीकरण, गाझाचे शासन आणि पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणे हे अजूनही प्रलंबित आणि अत्यंत जटिल मुद्दे आहेत. त्यामुळे गाझा करार हा सध्या युद्ध थांबवण्याचा एक तात्पुरता उपाय आहे, असं स्पष्ट दिसतं. युद्धविराम आणि दीर्घकालीन शांततेसाठी तयार करण्यात आलेल्या २० बिंदूंच्या योजनेंतर्गत हमासचे निरस्त्रीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर हे झाले नाही, तर गाझामध्ये पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली होती, जेव्हा हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला करून १,२०० लोकांना ठार मारले आणि २५१ लोकांना बंदी बनवले.त्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली, ज्यात आतापर्यंत ६७,००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या इस्रायलने गाझामधील हल्ले थांबवले आहेत, पण ही शांतता किती काळ टिकेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande