अमेरिकेसाठी पोस्टाची भारतीय टपाल सेवा सुरू
सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। सीमा शुल्कामुळे दोन महिन्यांपासून अमेरिकेसाठीची भारत टपाल सेवा बंद होती. अमेरिकन सीमाशुल्कांच्या नव्या अटींनुसार बंद पडलेली आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.भारतीय टपाल विभागाच्या वतीने अमेरिका देश
अमेरिकेसाठी पोस्टाची भारतीय टपाल सेवा सुरू


सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

सीमा शुल्कामुळे दोन महिन्यांपासून अमेरिकेसाठीची भारत टपाल सेवा बंद होती. अमेरिकन सीमाशुल्कांच्या नव्या अटींनुसार बंद पडलेली आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.भारतीय टपाल विभागाच्या वतीने अमेरिका देशासाठी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवा अमेरिकेच्या आयात नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यानुसार ईएमएस (स्पीड पोस्ट), एअर पार्सल आणि आयटीपीएस या सर्व सेवा आता अमेरिकेसाठी उपलब्ध आहेत.अमेरिकन सीमा शुल्कांच्या नव्या अटींनुसार, भारतातून पाठविल्या जाणाऱ्या टपाल वस्तूंवर भारतातच सीमाशुल्क आकारले जाणार आहे. ही डिलिव्हरी ड्यूटी पेड पद्धतीने वसूल केली जाईल. ग्राहकांनी वस्तूंची खरी किंमत अचूकपणे नमूद करावी, जेणेकरून सीमाशुल्क प्रक्रिया आणि वितरण सुरळीत पार पडेल. या सुविधेसाठी भारतीय टपाल विभागाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande