परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था आणि सुभेदार परिवाराच्या वतीने आयोजित स्व. सुभेदार बंधु उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेचे सचिव विजयसिंह जामकर म्हणाले, “पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होते आणि माणूस अधिक सक्षमपणे कार्य करू लागतो. सुभेदार बंधु पुरस्कार हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ऊर्जावान आणि प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर होते. प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ. अभयराव सुभेदार, संचालक सौ. दिपलक्ष्मीताई जामकर, सौ. सोनियाताई जामकर, सौ. मुग्धाताई सुभेदार, सौ. मृणालताई सुभेदार, सौ. नेहाताई सुभेदार, मंगेशकराव सुभेदार, गोविंदराव नांदापूरकर, हर्षलभैय्या सुभेदार, शंतनुभैय्या सुभेदार, सुकन्या आरोही सुभेदार तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते स्व. राजाभाऊ सुभेदार, स्व. ॲड. बाळासाहेब सुभेदार आणि स्व. कमलताई जामकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता आवचार यांनी केले.
या प्रसंगी ॲड. किरणराव सुभेदार म्हणाले, “गुणीजनांचा गौरव व्हावा या हेतूने स्व. सुभेदार बंधु पुरस्कार दिला जातो. हा सन्मान प्रेरणादायी ठरून आगामी काळात अधिक चांगले कार्य घडावे, अशी अपेक्षा आहे.”
स्व. सुभेदार बंधु उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महेश शिवाजीराव जाधव, कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक शिवाजी किशनराव लोडे, नूतन विद्यामंदिर मुला-मुलींचे हायस्कूलचे सहशिक्षक केशव विश्वंभर बोराडे यांना तर उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार रोहन प्रवीण रुघे (इ. ९ वी), रहिम मोहम्मद गौस शेख (इ. १० वी) यांना शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार हेमंत भरतराव संघई, ग्रंथपाल, कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांना देण्यात आला.
या वेळी पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, स्वारातीम विद्यापीठ नांदेडच्या परभणी जिल्हास्तरीय संशोधन महोत्सव २०२५ मध्ये कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या कु. शितल राजेश नंद (प्रथम) व संस्कृती स्वप्निल पदमावार (द्वितीय) यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण पडघन यांनी केले व त्यांनीच आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis