स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा निर्णय महायुतीचे नेते घेणार - रविंद्र चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती कडून लढाईच्या किंवा स्वबळावर लढवायच्या या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असे भारतीय
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती कडून लढाईच्या किंवा स्वबळावर लढवायच्या या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, मतदारसंघनिहाय नियोजन तसेच संघटनात्मक बळकटी यावर पदाधिकाऱ्यांशी संवाद त्यांनी साधला.

याप्रसंगी मंत्री श्री.अतुल सावे, प्रदेश महामंत्री आमदार श्री.संजय केणेकर ,खासदार श्री.भागवत कराड, महामंत्री आ.विक्रांत पाटील, संघटन मंत्री श्री संजय कोडगे यांच्यासह प्रमुख जिल्हा पदाधिकारी यांची बैठकीस उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande