सोलापूर - अवंती नगरात दोन चोरटे जेरबंद
सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। चौघे रेल्वेने सोलापूर शहरात आले. दोन ठिकाणाहून दुचाकी आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली. कारमधून चोरी करायचे घर शोधले. अवंती नगरातील दोन घरांमध्ये चोरी केली. दागिने, रोकड घेऊन पसार झाले आणि चोरीची
सोलापूर - अवंती नगरात दोन चोरटे जेरबंद


सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। चौघे रेल्वेने सोलापूर शहरात आले. दोन ठिकाणाहून दुचाकी आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली. कारमधून चोरी करायचे घर शोधले. अवंती नगरातील दोन घरांमध्ये चोरी केली. दागिने, रोकड घेऊन पसार झाले आणि चोरीची वाहने अंधारात सोडून पुन्हा ते बस व रेल्वेने पसार झाले. त्यातील दोघांना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मध्यरात्री चौघांनी अवंती हाउसिंग सोसायटीतील दोन घरांमध्ये जबरी चोरी केली होती. गळ्याला चाकू लावून त्यांनी दोन्ही घरातील दागिने, रोकड चोरून नेली होती. तोंडाला मास्क लावून चौघेही चारचाकीतून पसार झाले होते. मेरबानसिंग मायासिंग दुधानी (वय ३४, रा. विजयपूर, कर्नाटक), हरेश विजयकुमार रामत्री (वय ३२, रा. बदलापूर, ठाणे) अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन दुचाकी, कार आणि एक सोन्याची अंगठी, काही रोकड असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande