सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)वडाळा येथे अवैध सावकारी करणाऱ्याच्या घरावर उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पथकाला घरामध्ये विविध व्यक्तींच्या सह्या असलेले २५ कोरे धनादेश, १०० रुपयांचे स्टँपपेपर, व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वह्या, सोने तारण ठेवून व्याजाने दिलेल्या रकमांच्या नोंदी असलेली डायरी आदी दस्तऐवज आढळून आले. या प्रकरणात त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहनिबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. आर. संकद, डी. एस. साळुंखे, श्रीमती एस. बी. कासार, जी. एस. कोळी यांच्या पथकाने वडाळा येथील विक्रम झुंजरकर याच्या घरावर छापा टाकला.
यावेळी घर झडतीमध्ये अवैध सावकारीच्या अनुषंगाने विविध व्यक्तींच्या सह्या असलेले २५ कोरे धनादेश, शंभर रुपयांचे स्टँपपेपर, अर्जदारांचे खरेदी दस्त व आयडीबीआय बँकेचे २ कोरे धनादेश, अर्जदार व इतर व्यक्तींच्या नोंदी असलेल्या व्यवहाराच्या नोंदवह्या, सोने तारण ठेवून व्याजाने दिलेल्या रकमांच्या नोंदी असलेली डायरी आदी दस्तऐवज आढळून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड