तन्वी शर्मा जागतिक ज्युनियर बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पाचवी भारतीय
गुवाहाटी, १८ ऑक्टोबर (हिं.स.). भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार तन्वी शर्माने शनिवारी BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद २०२५ च्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. तन्वीने उपांत्य फेरीत आशियाई ज्युनियर अजिंक्यपद रौप्यपदक विजेती
तन्वी शर्मा


गुवाहाटी, १८ ऑक्टोबर (हिं.स.). भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार तन्वी शर्माने शनिवारी BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद २०२५ च्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. तन्वीने उपांत्य फेरीत आशियाई ज्युनियर अजिंक्यपद रौप्यपदक विजेती चीनची लिऊ शी या हिचा १५-११, १५-९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. स्पर्धेतील अव्वल मानांकित तन्वी आता अंतिम फेरीत थायलंडच्या दुसऱ्या मानांकित अन्यपत फिचितप्रीचसाक हिच्याशी सामना करणार आहे.

या विजयासह, १६ वर्षीय तन्वी जागतिक ज्युनियर्सच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तन्वी आधी अपर्णा पोपट (१९९६), सायना नेहवाल (२००६, २००८), सिरिल वर्मा (२०१५) आणि शंकर मुथुस्वामी (२०२२) होते.

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजय मिळवून तन्वीने भारतासाठी पदक निश्चित केले होते. २००८ मध्ये सायना नेहवालनंतर जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. १७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर भारताचे हे पहिले पदक आहे. उपांत्यपूर्वी फेरीत तन्वीने जपानच्या साकी मात्सुमोतोचा १३-१५, १५-९, १५-१० असा रोमांचक सामना जिंकला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande