महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाला इंग्लंडचे आव्हान
भोपाळ, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाचा पाचवा सामना इंग्लंडविरुद्ध आहे. टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत एकूण चार सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. पण टीम इंडियाने स्पर्धेत चा
भारतीय महिला क्रिकेट संघ


भोपाळ, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाचा पाचवा सामना इंग्लंडविरुद्ध आहे. टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत एकूण चार सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. पण टीम इंडियाने स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नंतर पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेवर मात करू शकला नाही. यामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

भारतीय संघाला स्पर्धेत अजून तीन सामने खेळायचे आहेत. हरमनप्रीतच्या संघाला इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्हीही मजबूत संघ आहेत. त्यामुळे टीम इंडियाला केवळ या दोन्ही संघांना पराभूत करावे लागणार नाही तर चांगला धावगतीही राखावी लागेल. जर भारतीय संघाने त्यांचे तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे १० गुण होतील आणि ते आरामात उपांत्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पण जर त्यांनी एकही सामना गमावला तर ते इतर संघांवर अवलंबून राहील. म्हणूनच टीम इंडिया त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकवण्यावर भर असेल.

ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता.ज्यामुळे कांगारूंना नऊ गुण मिळाले आणि ते गुणतालिकेत आघाडीवर राहिले. परिणामी उपांत्य फेरीसाठी स्पर्धा करणारे तीन संघ भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड आहेत.

गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांपैकी चार विजयांसह ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे चार सामन्यांपैकी सात गुण आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांपैकी तीन गुणांसह न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश संघांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande