अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी पोहचली केदारनाथला
मुंबई , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी केदारनाथला पोहचली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने केदारनाथला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावरुन मंजिरीने केदारनाथ ट्रिपच
अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी पोहचली केदारनाथला


मुंबई , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी केदारनाथला पोहचली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने केदारनाथला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावरुन मंजिरीने केदारनाथ ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मंदिर बंद होण्यापूर्वी मंजिरीने केदारनाथचे दर्शन घेतल्यामुळे तिचा १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा संकल्प लवकरच पूर्ण होईल.

या केदारनाथ यात्रेदरम्यानचे अत्यंत सुंदर फोटो मंजिरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मंजिरी ओक सध्या तिची महत्त्वाची १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करत आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत मंजिरीने या १२ ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात केली होती. जिथे ती प्रसाद ओकसोबत दर्शनासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वीच तिने वाराणसी येथे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले होते. दरम्यान, यंदा अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांसारख्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी केदारनाथला भेट दिली होती.

भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे लवकरच बंद होणार आहेत. दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी हे मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते आणि थेट सहा महिन्यांनंतर, म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्यात पुन्हा उघडते. यंदा केदारनाथ मंदिराचे द्वार २३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. त्यापूर्वीच अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande