मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळवण्यात आली. यावेळी गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा बहारदार दिवाळी पहाट कार्यक्रम साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मराठी संस्कृती जपणारे सांस्कृतिक कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे रंगलेल्या या कार्यक्रमात गाजलेल्या चित्रपट गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम ख्यातनाम गायिका उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, दत्ता मदन, दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे, संगीत संयोजन अमित गोठीवरेकर तर निवेदन अमित काकडे यांनी
केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर