अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळी सण संपूर्ण देशात साजरा केला जातो दिवाळी सण 5 दिवसाचा असतो या 5 ही दिवसाचा आनंद बालगृहातील बालके यांना घेता यावा या करिता आज पहाटे शासकीय बालगृहात दिवाळी पहाट कार्यक्रम चे आयोजन महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समिती अकोला यांच्या वतीने आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, रेल्वे चाईल्ड हेल्प लाईन, विपला फाउंडेशन, एसेस टू जस्टिस, एन्करेज फाउंडेशन,या सर्वांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एस भदाणे मॅडम, बाल न्याय मंडळ अध्यक्ष श्रीमती सुवर्णा कुळकर्णी मॅडम, बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर लाभले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे