अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील तेल्हारा-खापरखेडा मार्गावर आज सायंकाळी पाच वाजता भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ऍपे आणि कारमध्ये हा अपघात झाला. ऍपे वाहनात एकूण दहा जण प्रवास करत होते. यापैकी दीपक दुबे यांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. तर शेख शाहिद, विशाखा गवारगुरु, संजीवनी दामोदर, सविता भटकर, राजपाल भटकर, उषाबाई वानखडे, वासुदेव गवारगुरु, मोहम्मद शहा रहीम शहा आणि देवेंद्र दुबे असे जखमींची नावे आहेत. जखमींपैकी काहींना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात एवढा भीषण होता की तीन चाकी ऍपे वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे