अकोला : कुख्यात गुंडाला शस्त्रासह अटक
अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने अकोला शहरात अवैध धंदयाविरूध्द प्रभावी कार्यवाही करणे बाबत आदेशीत करण्यात आले असल्याने स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमंलदार यांना शहरात अवैध धंदयावर कार्यवाही करणे कर
प


अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने अकोला शहरात अवैध धंदयाविरूध्द प्रभावी कार्यवाही करणे बाबत आदेशीत करण्यात आले असल्याने स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमंलदार यांना शहरात अवैध धंदयावर कार्यवाही करणे करीता आदेशीत केले असता सपोनि विजय चव्हाण, पोउपनि माजीद पठाण, विष्णु बोडखे हे त्यांचे पथकाने गुप्त माहीती काढुन पो स्टे सिटी कोतवाली हददीतील चिवचिव बाजार परिसरात आरोपी नामे मिथुन उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे वय-४५ वर्ष रा-चिवचिव बाजार अकोला याचे घरात छापा कार्यवाही केली असता आरोपीच्या ताब्यातुन लोखंडी धातुचा देशी क‌ट्टा (अग्निशस्त्र), एक जिवंत काडतुस, लोखंडी तलवार व लोखंडी कट्टा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उददेशाने जवळ बाळगत असतांना मिळून आला त्याचे कडुन एकुण ३१,३००/- रूपयाचा मुददेमाल अवैधरित्या विनापरवाना बाळगतांना मिळुन आल्याने सदरील मुददेमाल जप्त करून आरोपी विरूध्द पो स्टे सिटी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक यांचा मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि माजीद पठाण, विष्णु बोडखे पो. अमंलदार पोहेकों शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, किशोर सोनुने, एजाज अहमद, वसीमोददीन, भास्कर धोत्रे, पोकॉ अशोक सोनुने, श्रीकांत पातोंड, पोहवा प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande