नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
: नाशिक जिल्ह्यातील १५ तालुके व १९३० गावे येथील तरुणांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे ‘अर्थ व उद्योग साक्षरता अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची विशेष मोहीम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगवे यांनी केली.
सिंहस्थ कुंभमेळा निमित्त नाशिकच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, कुंभमेळ्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सर्व व्यापारी व औद्योगिक संघटनांना सोबत घेऊन कार्य करणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णयही चर्चासत्रात घेण्यात आला.
या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगवे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, विक्रम सारडा, संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष संजय सोनवणे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, तसेच त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब कडलक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV