नांदेड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।बाल विकास प्रकल्प कार्यालय नांदेड शहर तर्फे आठव्या राष्ट्रीय पोषण माह चा समारोप साई लॉन्स येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले होते.त्यांनी यावेळी बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी,इतर साहित्य पुरवले जाईल व शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास तिथे अंगणवाडी भरविण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले.
बाल विकास प्रकल्प कार्यालय,नांदेड शहर ने राष्ट्रीय पोषण माह मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी सर्व मदतनीस व सेविका यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 30 हजार रुपये रक्कम दिली.कार्यक्रमास लेखाधिकारी नीलकंठ पाचंगे, वैद्यकीय अधिकारी रिठे ,बाल न्याय मंडळ सदस्या श्रीमती सुप्रिया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोषण महा दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.पोषण माह दरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पाककला आयोजित करण्यात आली होती.पोषण व आरोग्य यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली.या दरम्यान त्यांनी महिनाभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीमती गुंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व पर्यवेक्षिका गुंडारे,पेंदे ,शिसोदे ,गरुड ,खिराडे ,राहेगावकर , श्री आऊलवार,श्री खूपसे ,यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी प्रकल्पातील सर्व मदतनीस,सेविका व पालक वर्ग उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis