दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - अमरसिंह पंडित
बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। गेवराई मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले आहे. कृष्णाई येथे आयोजित संजय गांधी न
अ


बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

गेवराई मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

कृष्णाई येथे आयोजित संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजुरी पत्राचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते १६४ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.

गेवराई शहरातील कृष्णाई येथे तालुक्यातील १६४ दिव्यांग लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, नायब तहसिलदार श्री. संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. भाऊसाहेब नाटकर, माजी नगराध्यक्ष श्री. महेश दाभाडे, माजी नगरसेवक श्री. राधेशाम येवले यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, येणार्‍या काळामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील एकही दिव्यांग बांधव रास्त योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ, दिव्यांग बांधवांसाठी गेवराई कार्यालयात वेगळा कक्ष सुरू करण्यात आला असून दर सोमवारी पात्र लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे या कार्यालयात जमा करावीत. दिव्यांग बांधवांना सन्मानपूर्वक ही सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करतांना या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देतांना कोणी पैशासाठी अडवणूक केली तर थेट मला फोन करण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले.

प्रास्तविक करतांना नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया बाबत सखोल माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande