नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) पाकिस्तान हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन अफगाण क्लब क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल बीसीसीआय आणि आयसीसीने शोक व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले आहे की, निरपराध जीवांचे, विशेषतः क्रिकेटपटूंचे नुकसान हे हृदयद्रावक आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, या दुःखाच्या वेळी आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डा सोबत आहोत.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी लिहिले की, युवा अफगाणिस्तान क्रिकेटपटू कबीर, अगाह, सिबगतुल्ला आणि हारून यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. हल्ल्यामुळे त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. या तरुण खेळाडूंचे निधन केवळ अफगाणिस्तान क्रिकेटसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतासाठी विनाशकारी बातमी आहे. या कठीण काळात आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबत उभे आहोत.
बीसीसीआयने मीडिया म्हटले आहे की, बीसीसीआय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबत उभा आहे. क्रिकेट समुदाय हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. बोर्ड या प्रकारच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.
पाकिस्तानी हल्ल्यात तीन अफगाण क्लब क्रिकेटपटू ठार झाले. चौदा अफगाणिस्तानचे क्रिकेटपटूही ठार झाले आणि १६ जण जखमी झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील ४८ तासांचा युद्धबंदी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता संपला आणि तो वाढवण्याचा करार झाला. पण काही तासांनंतरच पाकिस्तानने पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला.
दोन्ही देशांच्या सीमेवरील डुरंड रेषेजवळ असलेल्या उरगुन आणि बारमल जिल्ह्यातील अनेक घरांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. या घटनेला प्रतिसाद म्हणून, एसीबीने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेण्याची घोषणा केली. एसीबीने सांगितले की, मृतांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार होते.
एसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर असे म्हटले की, हल्ल्यात पक्तिका प्रांताची राजधानी शराणा येथे एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यातून परतणाऱ्या क्रिकेटपटू कबीर, सिबघाटुल्लाह आणि हारून यांना लक्ष्य करण्यात आले. एसीबीने हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.
हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेतली. संघ १७ आणि २३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणार होता. पाकिस्तानच्या भूमीवर अफगाणिस्तान खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. जरी अफगाणिस्तानने यापूर्वी २०२३ च्या आशिया कप आणि या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये सामने खेळले असले तरी, त्यांना यजमान संघाचा सामना करावा लागला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे