बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून अन्न,निवारा व शासकीय मदत मिळवून दिली. याबद्दल सभापती रामेश्वर गोरे यांचे आमदार धस यांनी कौतुक केले आहे.
पाटोदा शहरात काही दिवसां पूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या भीषण परिस्थितीत पाटोदा नगरपंचायतचे सभापती रामेश्वर गोरे यांनी लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत खऱ्या अर्थाने संकट मोचकाची भूमिका बजावली. आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहून सभापती गोरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे जबाबदारीचे काम अत्यंत तत्परतेने पार पाडले. तर पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न,निवारा, आणि शासकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी धावपळ केली.गोरे यांनी नगरपंचायतच्या यंत्रणेला सतत सज्ज ठेवत मदत पोहोचविण्याचे काम केले. पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर देत,त्यांच्या अडचणी ऐकून घेत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत उपाययोजना केल्या. नागरिकांची अडचण दूर होईपर्यंत त्यांनी स्वतः घटनास्थळी राहून देखरेख केली.गावातील वयोवृद्ध, महिला, लहान मुलांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, अन्नधान्य वितरण, तात्पुरते निवारा केंद्र उभारणे,तसेच नागरिकांना शासकीय मदत मिळवून देणे या सर्व आघाड्यांवर सभापती गोरे यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या कार्यामुळे पाटोदा शहरातील अनेक नागरिकांना दिलासा मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis