नांदेड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)किर्तन सेवेसारख्या आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाद्वारे लोकजागृती, ,धर्म संस्कृती, संतांची शिकवण व जगण्याचा व्यवहार समाजाला सातत्याने दिशा देत राहील.धर्म सद्विचारांची दिशा देणारा हा कार्यक्रम सन्मार्गावरुन चालण्यासाठी प्रेरक ठरणारा असाच
आहे, असे प्रतिपादन नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार राजेश पवार यांनी केले. मुगाव (ता. नायगाव) येथे मुगाव ग्रामस्थ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. शिवलिलाताई पाटील महाराज यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी धार्मिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिगण, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, भाविक भक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाजपचे नायगाव तालुकाध्यक्ष श्री. श्रीहरी देशमुख, श्री. माणिकराव लोहगावे (नांदेड दक्षिण, भाजप जिल्हा सरचिटणीस) भाजप-महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis