ठाणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र कडेचा यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून दिवाळीच्या मुहूर्तावर आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे स्वागत केले, तसेच सर्वांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
याचवेळी मुंबईतील मानखुर्द प्रभाग क्रमांक १३५ चे अपक्ष उमेदवार रणजित वर्मा ऊर्फ लालुभाई यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह संकट मोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष राम पासवान, राजपाल राम, अशोक यादव, संजय राजभर, आणि मदिना मस्जिदचे खजिनदार मोहम्मद शफीक खान, हाजी अब्दुल अजीज, अब्दुल जब्बार सिद्दिकी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक, त्यांचे पुत्र प्रशांत शिवाजीराव मुसमाडे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रमोद मुसमाडे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक तुषार शेटे, माजी नगरसेवक अनिल शेंडगे, माजी उपनगराध्यक्ष ऍड. अजय पगारे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई माणिक जगताप, विद्या कांबळे, संगीता जगताप, रंजना जाधव, विशाखा दुर्गे, सविताताई पठारे यांनीही हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
तसेच अहिल्यानगर मधील श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक किरण कुनिया, राजेंद्र कांबळे, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन शशिकांत कुडूसकर, किरण सोनवणे, संजय पांडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत हिवराळे आणि त्यांच्यासह २०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधील ताथवडे गावातील जीविका फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत नवले, माजी सरपंच निरगुडी पुणे, हवेलीचे तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे, उद्योजक राजीव वागजकर, हवेलीचे उबाठा विभागप्रमुख केतन गायकवाड, सुरेश गायकवाड, लंकेश दळवी, योगेश धोत्रे, सुशील खंडागळे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, शिवसेनेचे विभागप्रमुख स्वप्नील टेम्बविलकर आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी