नाशिकमध्ये 500 टवाळखोरांवर कारवाई
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : - शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ''गुन्हेगारी क्लीन सिटी'' मोहीम हाती घेतली आहे. खून, चोरी, फसवणूक, खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील
नाशिकमध्ये 500 टवाळखोरांवर कारवाई


नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : - शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 'गुन्हेगारी क्लीन सिटी' मोहीम हाती घेतली आहे. खून, चोरी, फसवणूक, खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील काही महिन्यांत शहरात वाढ झाल्यानंतर शहर पोलीस खऱ्या अवनि अक्शन मोडवर दिसून येत आहे. गेल्या २० दिवसांत तब्बल ३,६६८ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून, या मोहिमेचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून हळूहळू उदयास येत असून, मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. त्रास देणाऱ्या अनेक गुंडांना पोलिसांकडून अटक या कारवाईत गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ आदींच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याने आघाडी घेतली असून, तब्बल ५०० टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यानंतर सातपूर, इंदिरानगर, अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो, पंचवटी पोलिसांच्या या कठोर मोहिमेमुळे शहरातील बाहुबली नेते, कार्यकर्ते आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांना त्रास देणाऱ्या अनेक गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही जणांनी खाकीच्या धाकाने अंडरग्राऊंड होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. नाशिक पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी गुन्हेगारीमुक्त नाशिकसाठी पोलीस प्रशासनाला पाठिंबा दिला आहे. पोलीस स्टेशननिहाय कारवाईची आकडेवारी नुसार पंचवटी, आडगाव २७९, म्हसरूळ २०४ , सरकारवाडा १८९,भद्रकाली, १२३ , मुंबई नाका १२३, गंगापुर २१३, अंबड ३६१ सातपूर ४४१ इंदिरानगर ४००, नाशिकरोड २५४, उपनगर २९०, देवळाली कॅम्प १०७, एमआयडीसी चुंचाळे २०४ अशी आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande