परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात पुरूष व महिला न्यायालयीन बंदी यांच्याकरीता दिवाळी निमित्त संगितोत्सव दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भुषण म. काळे यांनी उपस्थित सर्व न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अनेक पुरुष व महिला न्यायबंदी यांनी गायन करुन त्यांच्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमास कारागृह अधिक्षक श्री. आर.व्ही. मरळे (जिल्हा कारागृह वर्ग-२) यांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य प्रयत्न केले
या कार्यक्रमास जिल्हा कारागृह येथील अधिकारी, कमर्चारी वृंद, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी येथील कर्मचारी यांची उपस्थिती होती व त्यांनी सुध्दा सर्व न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis