रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू
जळगाव,, 20 ऑक्टोबर (हिं.स.) रावेर रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील प्रवासी राजेंद्र कुमार निकम (वय ५०) यांचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,
रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू


जळगाव,, 20 ऑक्टोबर (हिं.स.) रावेर रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील प्रवासी राजेंद्र कुमार निकम (वय ५०) यांचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–कानपूर एक्सप्रेस रावेर स्थानकातून सुटत असताना ही दुर्घटना घडली. प्रवासादरम्यान झोपेतून उठून बाथरूमकडे जात असताना राजेंद्र कुमार यांचा तोल गेला आणि ते थेट रेल्वे रुळांवर पडले. ट्रेनचा वेग जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण ठरला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर प्रवाशांमध्ये आणि स्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक रवी पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, संबंधित यंत्रणेला कळवले आणि मृतदेह उचलून रावेर स्मशानभूमीकडे नेण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत राजेंद्र कुमार निकम यांच्यासोबत नितीन कुमार निकम, मंटु निकम, अनिकेत निकम आणि अनुज निकम हे नातेवाईकही प्रवास करत होते. त्यांच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande