बीड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।बीड जिल्हा पोलीस दला तर्फे सर्व शहीद पोलीस जवानांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम बीड येथे पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आला.जिल्हा चे पोलीस अधीक्षक नवनीत कावत याप्रसंगी उपस्थित होते.त्यांचा पराक्रम आणि स्मृती आमच्या अंतःकरणात सदैव जिवंत राहील असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
आजचा दिवस त्या शूर पोलीस जवानांच्या स्मृतीस समर्पित आहे, ज्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या रक्षणासाठी आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर आपले प्राण अर्पण केले. असे ते म्हणाले.त्यांचा त्याग, शौर्य आणि निष्ठा ही आपणा सर्वांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभआहे. देशासाठी दिलेलं त्यांचं बलिदान हे कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचं सर्वोच्च उदाहरण आहे.
आज आपण त्या सर्व वीरांना सलाम करतो, ज्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा अमूल्य जीव अर्पण केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis