चाळीसगाव : माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
जळगाव, 21 ऑक्टोबर (हिं.स.): चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठ
माजी आमदार राजीव देशमुख यांचे निधन


जळगाव, 21 ऑक्टोबर (हिं.स.): चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात चाळीसगाव विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीपूर्वी त्यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही शहराचे नेतृत्व केले होते. सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि संघटनेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.राजकीय वर्तुळात त्यांची एक अभ्यासू नेते म्हणून ओळख होती. आमदारकीनंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला होता. मात्र, सक्रिय राजकारणात ते कायम कार्यरत राहिले. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून त्यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत होते.राजीव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे चाळीसगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शोकाची लाट पसरली आहे. विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लिहीले की, आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सहकारी आणि चाळीसगावचे मा. आ. राजीवदादा देशमुख यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. आम्ही सर्वजण त्यांच्या या दुःखात सहभागी आहोत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande