बीड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।माजलगाव येथे मनकॉट जिनिंग कापूस खरेदी हंगाम २०२५ शुभारंभ करण्यात आला आहे .माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कापूस खरेदी हंगामामुळे शेतकऱ्यांना अधिक अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
आज माजलगाव येथे मनकॉट जिनिंग कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिलो.मागील २२ वर्षापासून ग्राहकांचा विश्वास जपत मनकॉट जिनिंगने कायमच शेतकऱ्यांचे हित जपण्याचं काम केलं.यावर्षी देखील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला जाईल असा विश्वास आहे.
अतिवृष्टी ग्रस्त माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी कापसाला योग्य हमीभाव दिला जाईल असा विश्वास आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी अनेकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis