अल-नासरची एफसी गोवावर 2-1 ने मात
पणजी(गोवा), २३ ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय मिडफिल्डर ब्रिसन फर्नांडिस एएफसी चॅम्पियन्स लीग २ मध्ये गोल करणारा पहिला भारतीय फुटब़लपटू बनून इतिहास रचला. त्याच्या गोलनंतरही एफसी गोवाला आपल्या घरच्या मैदानावर फतोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सौ
अल-नासरची एफसी गोवावर 2-1 ने मात


पणजी(गोवा), २३ ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय मिडफिल्डर ब्रिसन फर्नांडिस एएफसी चॅम्पियन्स लीग २ मध्ये गोल करणारा पहिला भारतीय फुटब़लपटू बनून इतिहास रचला. त्याच्या गोलनंतरही एफसी गोवाला आपल्या घरच्या मैदानावर फतोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सौदी अरेबियाच्या क्लब अल-नासरविरुद्ध १-२ असा पराभव सहन लागला.

अल-नासरने सामन्याच्या पहिल्या ३० मिनिटांत अँजेलो गॅब्रिएल आणि हरौने यांच्या गोलने २-० अशी आघाडी घेतली. पण ४१ व्या मिनिटाला ब्रिसन फर्नांडिसने शानदार चाल करून गोव्याला पुनरागमन करुन दिले. त्यानंतर गोव्याने दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त लढाऊ भावना दाखवली. पण त्यांना बरोबरीचा गोल करता आला नाही.

एफसी गोवाने प्रति-हल्ला रणनीती स्वीकारली. पण त्यांचे फुटबॉलपटू ताबा मिळवल्यानंतर लवकर संधी निर्माण करण्यात अयशस्वी झाले. ब्रिसन फर्नांडिस व्यतिरिक्त, चेंडू पुढे नेऊन कोणीही धोका निर्माण करू शकला नाही. मुहम्मद नेमिलने प्रयत्न केले. पण मध्यक्षेत्रात त्यांना अनेक वेळा शारीरिकदृष्ट्या मागे टाकण्यात आले. बोर्जा हेरेरा आणि डेजान ड्रॅझिक देखील विरोधी बचावाला आव्हान देण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे गोव्याची आक्रमक रणनीती अप्रभावी ठरली.

प्रशिक्षक जॉर्ज जीझसच्या संघाने मागील दहा सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते आणि या सामन्यातही त्यांनी चांगली सुरुवात केली होती. पण २-० अशी आघाडी घेतल्यानंतर, सौदी संघाने त्यांचा दबाव कमी केला, ज्याचा गोव्याने फायदा घेतला आणि ब्रिसनने गोल केला.

एफसी गोवाचे परदेशी फुटबॉलपटू अपेक्षेनुसार खेळू शकले नाहीत. दुखापतीमुळे २४ व्या मिनिटाला जेव्हियर सिव्हेरियोला बदली फुटबॉलपटू म्हणून खेळवण्यात आले. डेजान ड्रॅझिकने ब्रिसनला सहाय्य केले. पण तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. डेव्हिड तिमोर आणि पोल मोरेनो यांनाही मिडफिल्ड आणि डिफेन्समध्ये संघर्ष करावा लागला.बोर्जा हेरेरा यांनी काही चांगले कॉर्नर किक घेतले पण त्यांना त्यांच्या बचावात्मक जबाबदाऱ्या पार पाडता आल्या नाहीत.

फुटबॉल चाहत्यांना क्रिस्टियानो रोनाल्डोला मैदानावर पाहण्याची आशा होती. पण त्याला विश्रांती देण्यात आली. स्टेडियममधील खराब खेळपट्टीच्या परिस्थितीमुळे धोका टाळण्यासाठी त्याला मैदानात उतरवण्यात आले नसल्याती माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande