रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले.
मुंबई विद्यापीठांतर्गत कोकण झोन ४ आणि. जी.आय. टी. घरडा इंजिनीअरिंग महाविद्यालय (लवेल, खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली. स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने कोकण विभाग ४ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे सुवर्ण पदक व सांघिक विजेतेपद पटकावले. विजेत्या संघात मधुरा राऊत, सानिका लिंगायत, प्रसिद्धी सोनावणे, श्वेता खोडे, कृणाली सावंत, श्रेया सारंग, प्रियंका भोंगले, तनिष्का शिरधनकर, स्वरा शिंदे, श्रावणी शिंदे, शृजेश्वरी आवळकर, स्नेहा कदम, समीक्षा धनवे आणि श्रावणी शेलार या विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, गौरांग कुर्टे, मिनार कुर्टे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या महिला संघाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन यांच्यासह कार्यकारिणी आणि प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी