सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
कार्तिकी यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. वास्तविक अवघ्या पंधरा दिवसांवर वारी आली असताना कामाची सुरुवात झालेली नाही. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत बैठक घेऊन २७ ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहे.कार्तिकी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे ऐन वारीच्या तोंडावर कामे पूर्ण होणार का, त्या कामाचा दर्जा चांगला राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.कार्तिकी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीसाठी जवळपास ५ ते ६ लाख भाविक येतात. या वारीच्या नियोजनाबाबत येथील प्रांताधिकारी यांनी बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड