रत्नागिरी : देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सोनवडे येथे
रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथील आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सोनवडे (ता. संगमेश्वर) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार दि. २५ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे
रत्नागिरी : देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सोनवडे येथे


रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथील आठल्ये- सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सोनवडे (ता. संगमेश्वर) येथे आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर शनिवार दि. २५ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या शिबिरामध्ये सोनवडे गावातील वनराई बंधारे बांधकाम, ग्रामस्वच्छता, मंदिर, ग्रामपंचायत, तसेच शाळा परिसरात श्रमदान यांसारख्या श्रमदान कार्याबरोबरच जनजागरण फेरी, ग्रामसर्वेक्षण, महिला सबलीकरण उपक्रम, आरोग्यविषयक माहिती, यासारखे कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार आहेत.

शिबिराचे उद्‌घाटन २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता सोनवडे गावचे सरपंच अंकुश राऊत यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत भूषवणार आहेत. शिबिरात विज्ञान, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, ग्रामीण वस्तीमधील विकास, विमा क्षेत्रातील संधी व व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी विषयांच्या अनुषंगाने दुपारच्या सत्रात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचा समारोप दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सोनवडे येथील माध्यमिक विद्यालयात होणार आहे. यावेळी सोनवडे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी तसेच सोनवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयातील युवक-युवतींना व्यक्तिमत्त्व विकासासह श्रमप्रतिष्ठा, सहजीवन व ग्रामीण जीवनाची ओळख होणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयूरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे आणि स्वयंसेवक मेहनत घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande