नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
ट्वेन्टीवन शुगर्स लि. युनिट 3, शिवणी जा., ता.लोहा, जि.नांदेड बाॅयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री.स्वप्नील जाधव व त्यांच्या सुवद्य पत्नी यांचे शुभहस्ते विधीवत होमहवन पुजा विधी करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख व कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री सुरवसे सर्व खातेप्रमुख, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार , परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक, उपखाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis