झिम्बाब्वेचा अफगाणिस्तानवर एक डाव 73 धावांनी ऐतिहासिक विजय
हरारे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला एकतर्फी पराभव करून इतिहास रचला. एकमेव कसोटी सामन्यात यजमान संघाने अफगाणिस्तानला एक डाव आणि ७३ धावांनी पराभूत केले. या विजयाचा नायक बेन करन ठरला. त्याने शानदार
झिम्बाब्वेचा कसोटी क्रिकेट संघ


हरारे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला एकतर्फी पराभव करून इतिहास रचला. एकमेव कसोटी सामन्यात यजमान संघाने अफगाणिस्तानला एक डाव आणि ७३ धावांनी पराभूत केले. या विजयाचा नायक बेन करन ठरला. त्याने शानदार शतकासह संघाचा पाया रचला. तर ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नगारावा यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांची दाणादण उडवून टाकली.

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तान संघाचा डाव ३३ षटकांपर्यंतही टिकू शकला नाही. संपूर्ण संघ फक्त १२७ धावांवर बाद झाला. फक्त रहमानुल्ला गुरबाज (३७) आणि अब्दुल मलिक (३०) काही प्रतिकार करू शकले. तर उर्वरित फलंदाज झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. ब्रॅड इव्हान्सने भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या.तर ब्लेसिंग मुझारबानीने तीन विकेट्स घेऊन त्याला चांगली साथ दिली.

झिम्बाब्वेची सुरुवातही खराब झाली होती. पण बेन करनने चमकदार फलंदाजी केली. त्याने निक वेल्श (४९) आणि सिकंदर रझा (६५) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. करणने १२१ धावांची शानदार खेळी केली, तर ब्रॅड इव्हान्सनेही ३५ धावा जोडून संघाला ३५९ धावांपर्यंत पोहोचवले. अफगाणिस्तानकडून झिया-उर-रहमानने सात विकेट्स घेतल्या. पण इतर गोलंदाजांना यश आले नाही.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. इब्राहिम झद्रान (४२) आणि बहिर शाह (३२) यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु उर्वरित गोलंदाजांना धावा काढण्यात अडचण आली. संघ १५९ धावांवर ऑलआउट झाला. ज्यामुळे झिम्बाब्वेला ऐतिहासिक डाव आणि ७३ धावांचा विजय मिळवता आला. यावेळी रिचर्ड नगारावाने आपल्या धारदार गोलंदाजीने पाच विकेट्स घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande