
अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
सरकारी आरोग्य सेवांबाबत जनतेच्या तक्रारी काही नतीन नाहीत. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, उपचारात हलगर्जीपणा, तसेच आवश्यक सुविधा नसणे या तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. आता इर्विन जिल्हा सामान्य रुग्णालयातच औषधांचा संपूर्ण साठा संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून औषधे, ग्लुकोज आणि अन्य आवश्यक साहित्य विकत घ्यावे लागत आहे.
आय ड्रॉप्स आणि सामान्य गोळ्या संपल्या आहेत. जिल्ह्यातून आलेल्या काही रागरिकांनी तक्रार केली की, जिल्हा रुग्णालयात अनेक साध्या गोळ्यासुद्धा संपल्या आहेत. डोळ्यांच्या रुग्णांसाठी वापरले जाणारे आवश्यक आय इप्सिहीउपलब्ध नाहीत, डोळ्यांच्या उपचारात सतत आय ड्रॉप्स टाकणे आवश्यक असते, मात्र औषधे उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठी गैरसोय होत आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनीही औषधांचा साठा संपल्याचे मान्य केले आहे. त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरून दोन-तीन टेडरद्वारे औषधांची ऑर्डर देण्यात आली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत पुरेसा साठा उपलब्ध होईल. तसेच स्णालयातील दाखल रुग्णांसाठी सुमारे तीन आठवडे ते एक महिन्यापुरता माठा राखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सौंदळे म्हणाले, ग्लुकोज आणि इतर आवश्यक औषधींचीही मागणी केली आहे. यासाठी डीपीसीकडून निधीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी