परभणीत नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। असोला येथील 35 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व बॅकेच्या कर्जाला कंटाळून घरातील किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी(दि.२४) घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील मा
नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या


परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। असोला येथील 35 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व बॅकेच्या कर्जाला कंटाळून घरातील किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी(दि.२४) घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार परभणी तालुक्यातील आसोला येथील मयत शेतकरी गजानन ओमकार भरोसे(वय ३५) यांनी या वर्षी सतत अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने नापिकीला व बॅकेचे कर्जास कंटाळून घरातील किटकनाशक व तणनाशक औषध प्राशन केले. त्यांचा उपचारादरम्यान सरकारी दवाखाना परभणी येथे मुत्यु झाल्याची फिर्याद अनिल ओमकार भरोसे यांनी ताडकळस पोलीसांत दिली. यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन रणखांब हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन रणखांब, बालाजी रनेर, भगवान चोरघडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande