छ. संभाजीनगर - ५ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरवरील रोट्यात अडकून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील परदरी येथील श्री.गणेश घोडके यांच्या ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलाचे ट्रॅक्टरवरील रोट्यात अडकून मृत्यू झाला. या संदर्भात फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार अनुराधा चव्ह
५ वर्षांच्या चिमुकल्या मुलाचे ट्रॅक्टरवरील रोट्यात अडकून मृत्यू


छत्रपती संभाजीनगर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील

परदरी येथील श्री.गणेश घोडके यांच्या ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलाचे ट्रॅक्टरवरील रोट्यात अडकून मृत्यू झाला.

या संदर्भात फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी परदरी गावात भेट दिली. घोडके कुटुंबियांची भेट घेऊन त्या म्हणाल्या झालेलं दुःखद निधन अत्यंत वेदनादायक आहे. या प्रसंगी त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.

सर्व शेतकरी बांधवांना मनापासून आवाहन आहे की, शेतीची मशागत करताना कृपया लहान मुलांना ट्रॅक्टर किंवा रोट्यावर बसवू नये. अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande