
बीड, 26 ऑक्टोबर, (हिं.स.)।
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत एस आय टी चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले आहे.
डॉ.संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आपल्या बीडच्या लेकीस न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची एसआयटीमार्फत वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडून सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. अशी त्यावेळी त्यांनी सांगितले
पोटच्या लेकीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे डॉ. संपदा यांच्या भावास शासकीय नोकरीत शिक्षणअर्हतेनुसार नियुक्ती देण्याबाबतही आजच मुख्यमंत्री यांना फोन व पत्राद्वारे विनंती करण्यात येणार आहे.
आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होऊन फाशीची शिक्षा झाली तरच डॉ. संपदाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. लोकप्रतिनिधी म्हणून न्याय मिळेपर्यंत मुंडे कुटुंबासोबत खंबीरपणे उभा राहण्याचा विश्वास दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis