शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी संबंधितांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी -जिल्हाधिकारी
अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्‍या मतदारयाद्या नव्‍याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी अर्जाची सुविधा ऑनलाईन उपलब्‍ध असून,
प


अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्‍या मतदारयाद्या नव्‍याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी अर्जाची सुविधा ऑनलाईन उपलब्‍ध असून, सर्व संबंधितांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्‍याने मतदारयाद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानूसार नमुना क्रमांक-19 व्‍दारे अर्ज स्‍वीकारण्‍याचा अंतिम दिनांक 06 नोव्‍हेंबर, 2025 असा आहे.शिक्षक मतदार संघासाठी नमुना क्रमांक-19 मधील अर्ज भरण्‍याची सूविधा आता ऑनलाईन उपलब्‍ध असून त्‍यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्‍थळावर लॉगीन करुन पात्र शिक्षकांना आवश्‍यक त्‍या पुरावा कागदपत्रांसह दिनांक 06 नोव्‍हेंबर, 2025 रोजी पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

तसेच, शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक-19 मधील अर्ज आवश्‍यक पुराव्‍यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्‍याकडे *ऑफलाईन* दाखल करण्‍याची सध्याची कार्यपध्‍दतीसुध्‍दा मतदार नोंदणी कार्यक्रमाच्‍या वेळापत्रकानुसार दिनांक 06 नोव्‍हेंबर, 2025 रोजी पर्यत सुरु आहे. या सुविधेबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्‍यावी व पात्र शिक्षकांनी आपले अर्ज स्‍वीकारण्‍याच्‍या वर नमूद अंतिम दिनांकापर्यत सादर करावे असे आवाहन करण्‍यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande