जळगाव : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) दौलत नगर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय खुशी ज्ञानेश्वर पिसे या तरुणीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. आई मथुरेला यात्रेला गेली होती, वडील मंदिरात गेले होते, तर भाऊ कामानिमित्त बाहेर ग
जळगाव : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या


जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) दौलत नगर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय खुशी ज्ञानेश्वर पिसे या तरुणीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. आई मथुरेला यात्रेला गेली होती, वडील मंदिरात गेले होते, तर भाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता. घरात एकटी असलेल्या खुशीने हा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खुशी ही १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-वडील आणि भावासोबत दौलत नगरात राहत होती. वडील दर्शनासाठी मंदिरात गेले होते. काही वेळानंतर भाऊ घरी परतल्यावर त्याला बहिणीने घरात गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तिला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे भावाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शहर पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande