प्रतिका रावल महिला विश्वचषकातून बाहेर, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी भारताला धक्का
नवी मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. नवी मुंबईत बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग
प्रतिका रावल


नवी मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. नवी मुंबईत बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात प्रतिकाला झेल घेताना दुखापत झाली आणि तिला मैदान सोडावे लागले. ती ज्या पद्धतीने पडली त्यावरून स्पष्ट होते की ती बाद फेरीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २१ व्या षटकात ही घटना घडली. शर्मिन अख्तरने दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर मिडविकेटकडे शॉट मारला. प्रतिका रावल चेंडू थांबवण्यासाठी तिच्या डाव्या बाजूला धावली. तिचा पाय अचानक घसरला आणि तिचा घोटा मुरडला. वेदनेने विव्हळत रावल जमिनीवर पडली. त्यानंतर फिजिओने तिला मैदानाबाहेर जाण्यास मदत केली.त्यानंतर तिने भारताच्या डावात फलंदाजी केली नाही. तिच्या जागी अमनजोत कौरने स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात केली. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने ८.४ षटके फलंदाजी केली. या सामन्यात अमनजोत १५ धावांवर नाबाद राहिली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता उपांत्य फेरीच्या सामना स्मृती मानधनाबरोबर सलामीला अमनज्योत येणार की, कोणती नवी फलंदाज येणार ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande