भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
जोहान्सबर्ग, 27 ऑक्टोबर (हिं.स.)भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने संघात पुनरागमन केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी १४ न
टेम्बा बावुमाचा संग्रहित फोटो


जोहान्सबर्ग, 27 ऑक्टोबर (हिं.स.)भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने संघात पुनरागमन केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे आणि दुसरी कसोटी २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळली जाणार आहे.

सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये बावुमाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) चक्रात पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता. ही कसोटी मालिका जो १-१ ने बरोबरीत राहिली होती. तो या आठवड्यात पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या कोणत्याही व्हाईट-बॉल सामन्यातही खेळणार नाही.

पाकिस्तान मालिकेसाठी संघातील बहुतेक क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे, डेव्हिड बेडिंगहॅमची जागा बावुमा घेत आहेत.मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले, आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या संघातील बहुतेक क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे. त्या क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी दाखवली होती आणि ती मालिका बरोबरीत आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते.

ते पुढे म्हणाले, आम्हाला भारतातही असेच आव्हान अपेक्षित आहे आणि त्या परिस्थितीत चांगली कामगिरी करणारे अनेक क्रिकेटपटू पुन्हा एकदा आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील.कॉनराड म्हणाले, पाकिस्तानमध्ये सांघिक प्रयत्न होते आणि भारतातही तेच आवश्यक असेल. नेहमीच कठीण असलेल्या वातावरणात आपण स्पर्धात्मक राहतो याची खात्री करण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटूची भूमिका असते.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, डेवाल्ड ब्रुविस, झुबैर हमजा, टोनी डी जॉर्गी, कॉर्बिन बॉश, वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, सायमन हार्मर.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande