वादग्रस्त इस्लामी प्रचारक जाकिर नाईकच्या दौर्‍यास युनूस सरकारची मान्यता
ढाका, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने भारतात वाँटेड असलेल्या आणि वादग्रस्त इस्लामी प्रचारक जाकिर नाईकला बांग्लादेशात प्रवेश व स्वागताची परवानगी दिली आहे. युनूस सरकारने जाकिर नाईकच्या एका महिन्य
भारतात वाँटेड असलेला वादग्रस्त इस्लामी प्रचारक जाकिर नाईकच्या दौर्‍यास युनूस सरकारची मान्यता


ढाका, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने भारतात वाँटेड असलेल्या आणि वादग्रस्त इस्लामी प्रचारक जाकिर नाईकला बांग्लादेशात प्रवेश व स्वागताची परवानगी दिली आहे. युनूस सरकारने जाकिर नाईकच्या एका महिन्याच्या देशव्यापी दौर्‍यास मान्यता दिली असून, ही त्याची बांग्लादेशातील पहिली भेट असेल. युनूस यांचा हा निर्णय थेट भारतविरोधी पाऊल मानला जात आहे, कारण जाकिर नाईकला भारताने गुन्हेगार घोषित केलेले आहे.

कार्यक्रम आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या दौर्‍यासाठी सरकारची अधिकृत परवानगी मिळालेली आहे आणि काही सरकारी अधिकारी स्वतः सहकार्य करत आहेत.जाकिर नाईकचा दौरा 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून, त्याला सरकारी मान्यता प्राप्त आहे.

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी जाकिर नाईकवर बंदी घातली होती. जुलै 2016 मध्ये झालेल्या ढाका “होली आर्टिसन बेकरी” दहशतवादी हल्ल्यानंतर हसीना सरकारने नाईकच्या चॅनेलवर बंदी घातली होती. या हल्ल्यानंतरच जाकिर नाईक भारत सोडून पळून गेला.

बेकरी प्रकरणातील एका हल्लेखोराने बांग्लादेशी तपासकर्त्यांना सांगितले होते की, तो जाकिर नाईकच्या यूट्यूबवरील भाषणांपासून प्रेरित झाला होता. तेव्हापासून नाईक भारताचा फरार गुन्हेगार आहे, आणि त्याच्यावर द्वेष पसरविणे, सांप्रदायिक वैमनस्य भडकवणे आणि घातक विचारसरणी प्रसारित करणे अशा गुन्ह्यांखाली खटले दाखल आहेत.

भारताहून पळून गेल्यानंतर तो 2016 पासून मलेशियामध्ये राहत आहे. भारताने त्याचा प्रत्यर्पणाचा आग्रह अनेकदा मलेशियाकडे केला, मात्र मलेशियन सरकारने अद्याप त्यास मान्यता दिलेली नाही. गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या दौऱ्यासाठी पाकिस्ताननेही जाकिर नाईकच्या भेटीस परवानगी दिली होती, आणि आता बांग्लादेशात सरकार बदलल्यानंतर त्याला पुन्हा एकदा कट्टरपंथ पसरविण्याची मोकळीक देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande