अ‍ॅक्सिस बँक - हिटाची पेमेंट सर्व्हिसेसने केली 'एक्सप्रेस बँकिंग' लाँच
मुंबई, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकने, पेमेंट आणि कॉमर्स सोल्यूशन्समधील आघाडीच्या हिटाची पेमेंट सर्व्हिसेससोबत भागीदारी करून देशातील पहिले ‘डिजिटल बँकिंग पॉइंट – एक्सप्रेस बँकिंग’ सुरू क
Axis Bank


मुंबई, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकने, पेमेंट आणि कॉमर्स सोल्यूशन्समधील आघाडीच्या हिटाची पेमेंट सर्व्हिसेससोबत भागीदारी करून देशातील पहिले ‘डिजिटल बँकिंग पॉइंट – एक्सप्रेस बँकिंग’ सुरू केले आहे. या अभिनव ऑम्नी-चॅनल सोल्यूशनमुळे शाखा बँकिंगची नवी परिभाषा तयार होत असून, ग्राहकांना कॉम्पॅक्ट फॉरमॅटमध्ये सर्व बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. हिटाची पेमेंट सर्व्हिसेसच्या बँकिंग तंत्रज्ञान आणि पेमेंट सोल्यूशन्समधील कौशल्याचा लाभ घेत, या डिजिटल बँकिंग पॉइंटची रचना सुलभता आणि सोयीसाठी करण्यात आली आहे.

शाखा बँकिंग सेवांना नवा स्पर्धात्मक आयाम देत, एक्सप्रेस बँकिंगमध्ये बंडल्ड आणि कस्टमायजेबल सोल्यूशन कॉम्पॅक्ट डिजिटल लॉबी फॉरमॅटमध्ये दिले जाणार आहे. हे सेल्फ-सर्व्हिस आणि असिस्टेड मोड या दोन्ही प्रकारांत कार्यान्वित होऊ शकणार असून, त्याचे जलद तैनातीकरण शक्य आहे. आता ग्राहक 24x7 एक्सप्रेस बँकिंगमध्ये प्रवेश करून नवीन खाते उघडणे, तत्काळ कार्ड मिळवणे, फिक्स्ड डिपॉझिट बुक करणे, कर्जासाठी अर्ज करणे आणि वीज, पाणी, गॅस आदी युटिलिटी बिलांचे पेमेंट करणे अशा विविध सेवा घेऊ शकतील. ही ऑल-इन-वन सोय कार्ड प्रिंटर, चेक डिपॉझिटर, पासबुक प्रिंटर आणि एनएफसी क्षमतांसारख्या सुविधा उपलब्ध करून देते. महत्त्वाच्या सेवांचे डिजिटायझेशन करून ती जलद प्रक्रिया सक्षम करते आणि प्रगत, मॉड्युलर, विस्तारक्षम तसेच भविष्योन्मुख क्षमता प्रदान करते.

पारंपरिक बँकिंगवरील विश्वास आणि सुरक्षितता यांना डिजिटल इनोव्हेशनचा वेग व कार्यक्षमतेसोबत एकत्र आणत, डिजिटल बँकिंग पॉइंट अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आधुनिक, वापरकर्ताभिमुख इंटरफेससह सज्ज करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावतो. कॉम्पॅक्ट आणि लवचिक डिझाइनमुळे हे केंद्र अत्यल्प जागेत बसवता येते आणि शहरी भाग, ग्रामीण क्षेत्रे किंवा कम्युनिटी हब्स, कॉर्पोरेट पार्क्स, हॉस्पिटल्स आणि विद्यापीठे यांसारख्या ठिकाणी वेगाने कार्यान्वित करता येते.ही पुढील पिढीची सोय डिजिटल-फर्स्ट टचपॉइंट्ससह संपूर्ण बँकिंग सेवा उपलब्ध करून देते. त्यामुळे डिजिटलची चांगली जाण असलेल्या ग्राहकांपासून ते पहिल्यांदाच बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी समावेशकता सुनिश्चित केली जाते.

लॉन्चबद्दल प्रतिक्रिया देताना अ‍ॅक्सिस बँकेचे प्रेसिडेंट व हेड – ब्रँच बँकिंग (उत्तर, पूर्व आणि TASC बिझनेस) रेनॉल्ड डी’सूझा म्हणाले, “डिजिटल बँकिंग पॉइंट ही केवळ तांत्रिक नवकल्पना नाही, तर ती एक्सप्रेस बँकिंगमधील एका नव्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. सुरक्षित डिजिटल सेवांचे अखंड एकत्रीकरण करून हा किऑस्क भारतभरातील ग्राहकांना – मग ते महानगरात असोत किंवा ग्रामीण भागात – स्मार्ट, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह बँकिंगचा अनुभव देतो. हा उपक्रम बँकिंगची नव्याने व्याख्या करणे, ग्राहक अनुभव उंचावणे आणि विविध ग्राहकवर्गाच्या बदलत्या गरजा भविष्योन्मुख उपायांद्वारे पूर्ण करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे द्योतक आहे.”

हिटाची पेमेंट सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – कॅश बिझनेस, सुमील विकमसी म्हणाले :“भारताचे पहिले डिजिटल बँकिंग पॉइंट सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. बँकिंग सेवा पुरवण्याच्या पद्धतीत हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. तंत्रज्ञान-चालित बँकिंगच्या नव्या युगाची सुरुवात करत, हा उपक्रम संपूर्ण देशभरातील बँकिंग सेवांपर्यंतचा प्रवेश वाढविण्यात आणि सेवा डिजिटायझेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. पारंपरिक बँकिंग आणि डिजिटल बँकिंग यांच्यातील अंतर कमी करताना, आम्हाला विश्वास आहे की डिजिटल बँकिंग पॉइंट भारतातील ग्राहकांसाठी सुलभ आणि सोयीस्कर बँकिंग अनुभवाकडे मोठ्या प्रमाणावरील संक्रमणाचा पाया घालेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande