
संपूर्ण प्रकल्पाची महसूल क्षमता अंदाजे 10 हजार कोटींपेक्षा जास्त
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकसकांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: गोडरेजप्रॉप) ला महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा) कडून वरळी, मुंबई येथील त्यांच्या आगामी निवासी विकास प्रकल्प गोदरेज ट्रायलॉजी साठी प्रकल्प नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वात नामांकित परिसरांपैकी एक असलेल्या प्रमुख भूखंडाच्या पुनर्विकासाचा एक संयुक्त विकासप्रकल्प आहे. या पुनर्विकासात सुमारे ~2.63-एकर भूखंडावर तीन टॉवर्स उभारले जाणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाची एकूण अंदाजे महसूल क्षमता 10,000 कोटी रु. पेक्षा अधिक आहे.
डॉ. अॅनी बेझंट रोडच्या जवळ आणि प्रसिद्ध महालक्ष्मी रेसकोर्सला लागून असलेल्या या प्रकल्पातून रेसकोर्स आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसणार आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली प्रदान करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेल्या या निवासी प्रकल्पात मोठ्या खाजगी डेक्ससह प्रशस्त घरे आणि विचारपूर्वक तयार केलेल्या सुविधा असणार आहेत.
सध्या, प्रस्तावित तीन टॉवरपैकी दोन टॉवरसाठी रेरा मान्यता प्राप्त झाली असून त्यामध्ये फेज 1 मध्ये अंदाजे 11 लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्राचा समावेश आहे. मंजुरी मिळाल्यामुळे, सीटर्फ (Seaturf) आणि सीफ्रंट (Seafront) नावाचे टॉवर असलेला पहिला टप्पा चालू तिमाहीत सादर करण्यात येईल आणि तो कंपनीच्या दक्षिण मुंबईतील निवासी पोर्टफोलिओमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.
वरळी हे भारतातील सर्वात आकर्षक निवासी स्थानांपैकी एक म्हणून उदयास आले असून येथे अखंड कनेक्टिव्हिटी, महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांच्या जवळचे स्थान आणि विकसित सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या परिसरात नामांकित शाळा, रुग्णालये, रिटेल आउटलेट्स तसेच उच्च दर्जाच्या निवासी आणि व्यावसायिक इमारती आहेत. त्यामुळे सुज्ञ, चोखंदळ घरखरेदीदारांसाठी पसंतीचे ठिकाण ठरले आहे.
या विकासाबाबत टिप्पणी करताना गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, “आमच्या वरळी प्रकल्पासाठी रेरा मान्यता मिळणे हे आमच्या नियोजित विकास वेळापत्रकातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही जागा विस्तार, कनेक्टिव्हिटी आणि दृश्यमानतेचे दुर्मिळ मिश्रण आहे. हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील जीपीएलचे स्थान अधिक बळकट करत असून उच्च क्षमता असलेल्या शहरी भूखंडांचे अधिग्रहण व विकास करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. आम्ही रहिवाशांना उत्कृष्ट जीवनमान प्रदान करणारा एक निवासी पुनर्विकास प्रकल्प देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule