
नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने बीसीसीआयच्या होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्या रणजी करंडक सामन्यासाठी नाशिकची निवड केली असून या सामन्याच्या थरार अनुभवण्यासाठी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात तयारी पूर्णत्वास आली आहे. अशी माहिती नासिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी त्यांनी सांगितले की महाराष्ट्र व सौराष्ट्र हे दोन्हीही संघ बुधवारी नासिक मध्ये दाखल होणार आहे.
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरी मैदानात एक ते चार नोव्हेंबर यादरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्या रणजी क्रिकेट सामना आयोजित करण्यात आलेला आहे या सामन्यावर आयपीएल मध्ये सहभागी झालेले सौराष्ट्र संघाचे जयदेव उनाडकट, चेतन सकारीया , एच देसाई, चिराग जानी प्रेरक मकड, हे तर महाराष्ट्र संघाकडून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड , अशिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष हे प्रमुख खेळाडू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देऊन विनोद शहा यांनी सांगितले की या सामन्यासाठी नाशिक क्रिकेट संघटनेने तयारी पूर्ण केली असून मागील वेळी जे काही प्रकार झाले ते रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आलेले आहे नागरिकांनी या सामन्याचा आनंद घ्यावा आणि नाशिकचे नाव उंच करण्यासाठी मदत करावी असे आवाहन करून शहापुढे म्हणाले की, चांगलं नियोजन करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने बीसीसीआयचा रणजी क्रिकेट सामना हा नाशिककरांना दिला आहे.
या सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिलाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर अधिक माहिती देताना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी सांगितले की, आत्तापर्यंत नाशिकच्या कान्हेरे मैदानामध्ये एकूण 11 क्रिकेट रणजी सामने झालेले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त क्रिकेट सामने हे महाराष्ट्र क्रिकेट संघाने जिंकले आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या बरोबरीला तामिळनाडू गुजरात मुंबई आंध्र प्रदेश विदर्भ राजस्थान झारखंड उत्तर प्रदेश आणि बडोदरा या संघांनी सामने खेळलेले आहेत. महाराष्ट्र व सौराष्ट्र हे दोन्हीही क्रिकेट संघ बुधवारी नाशिक मध्ये दाखल होणार असून बुधवारपासूनच ते आपल्या सराव सुरू करणार आहेत असेही त्यांनी सांगितले यावेळी क्रिकेट संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV