
कॅनबेरा, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. सूर्यकुमार म्हणाला, श्रेयसची प्रकृती सुधारत आहे. त्याने मला फोनवर उत्तर दिले आहे. याचा अर्थ तो पूर्णपणे ठीक आहे. जे घडले ते खूप दुर्दैवी आहे, पण डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत. पुढील काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. आता काळजी करण्यासारखे काही नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव माध्यमांशी बोलत होता. अय्यरच्या दुखापतीबद्दल विचारले असता तो म्हणाला, पहिल्या दिवशी, जेव्हा मला कळले की तो जखमी आहे, तेव्हा मी प्रथम त्याला फोन केला. पण मला कळले की त्याच्याकडे फोन नाही. म्हणून मी माझ्या फिजिओला फोन केला. फिजिओने मला सांगितले की तो स्थिर आहे. पहिला दिवस कसा होता हे मी सांगू शकत नाही, पण तो आता बरा दिसत आहे. आम्ही दोन दिवसांपासून बोलत आहोत. तो प्रतिसाद देत आहे. जर तो फोनवर उत्तर देत असेल तर याचा अर्थ त्याची प्रकृती स्थिर आहे.
सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसला दुखापत झाली होती. हर्षित राणाचा झेल घेण्यासाठी तो पॉइंटवरून मागे धावला. त्याचा तोल गेला आणि पडला आणि त्याला दुखापत झाली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे