पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजची बांगलादेशवर १६ धावांनी मात
ढाका, 28 ऑक्टोबर (हिं.स.)पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशला १६ धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने ३ गडी गमावून १६५ धावा केल्या. कर्णधार शाई होपने ४६ आणि रोवमन पॉवेलने ४४ धावा केल्या आणि दोघेही
वेस्ट इंडिजचा संघ


ढाका, 28 ऑक्टोबर (हिं.स.)पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशला १६ धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने ३ गडी गमावून १६५ धावा केल्या. कर्णधार शाई होपने ४६ आणि रोवमन पॉवेलने ४४ धावा केल्या आणि दोघेही नाबाद राहिले.

बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश १९.४ षटकांत १४९ धावांवर बाद झाला. तन्झिम हसन शकिबने सर्वाधिक ३३ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्स आणि जेसन होल्डरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात दिली. अ‍ॅलिक अथानासे आणि ब्रँडन किंग यांनी ५० चेंडूत ५९ धावांची भागिदारी केली. अ‍ॅलिक अथानासे २७ चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. त्याला लेग-स्पिनर रिशाद हुसेनने बोल्ड केले. ब्रँडन किंगला वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने बाद केले. त्याने ३६ चेंडूत ३३ धावा केल्या.

८२ धावांत तीन विकेट गमावल्यानंतर कर्णधार शाई होपने कॅरेबियन संघाचा डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी केली आणि २८ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या, डावात चार षटकार आणि एक चौकार मारला. पण शेरफेन रुदरफोर्ड शून्यावर बाद झाला. त्याने तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक लिटन दासकडे झेल दिला. रोवमन पॉवेलने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली, १५७.१४ च्या स्ट्राईक रेटने २८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने डावात एक चौकार आणि चार षटकार मारले. पॉवेलने कर्णधार शाई होपसह एक बाजू लावून धरत त्याच्यासह ४६ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून तस्किन अहमदने दोन विकेट घेतल्या, तर लेग-स्पिनर रिशाद हुसेनने एक विकेट घेतली.

१६६ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेशने पॉवरप्लेच्या सहा षटकांत चार विकेट्स गमावल्या. सैफ हसन (८), तन्झिद हसन तमिम (१५), कर्णधार लिटन दास (५), आणि शमीम हुसेन (१) बाद झाले. सामन्यात पिछाडीवर असल्याचे दिसून येणाऱ्या बांगलादेशने पुनरागमन केले. मधल्या फळीतील फलंदाज तौहिद हृदयॉयने दोन चौकारांसह २८ धावा केल्या. तो जयडेन सील्सच्या चेंडूवर अकील हुसेनने झेलबाद झाला. त्यानंतर नुरुल हसनला खैरी पीरने पाच धावांवर बाद केले. तन्झिम हसन शकिबने सामना रोमांचक बनवला. त्याने आणि नुसम अहमदने २३ चेंडूत ४० धावा जोडल्या. शकिबने डावात तीन चौकार आणि एक षटकार मारला. त्याने संघासाठी सर्वाधिक ३३ धावा केल्या.

नुसम अहमदला जयडेन सील्सने २० धावा करून बाद केले. नुसमने १३ चेंडूंचा सामना केला आणि डावात ३ चौकार आणि एक षटकार मारला. रिशाद हुसेनला होल्डरने ६ धावांवर बाद केले. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना तस्किन अहमद १० धावांवर हिट विकेट झाला. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्स आणि जेसन होल्डरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर डावखुरा फिरकी गोलंदाज अकिल हुसेनने २ विकेट्स घेतल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande