
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
- बालविवाह लावून देत मुलीला गर्भवती करून मुलीला जन्म देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह सासरच्या व माहेरच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की पीडित मुलगी हिला उपचारार्थ इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिचा जबाब नोंदविला असता पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, तिचा तिच्या माहेरच्या व सासरच्या नातेवाईकांच्या संमतीने आरोपी सलमान अमीर सय्यद (रा. फुलेनगर, पेठ रोड, पंचवटी) याच्याशी बालविवाह झाला होता. या विवाहानंतर पती व अल्पवयीन पत्नीचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले व त्यातून ती गर्भवती झाली आणि काही दिवसांत तिने मुलीला जन्म दिला. हा प्रकार दि. २८ जानेवारी २०२२ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान फुलेनगर येथे घडला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपी सलमान सय्यदसह इतर नातेवाईकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा 5 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV