
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
- भीक मागण्यास नकार दिल्याचा राग आल्याने पतीच्या मामाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना चौक मंडई येथे घडली.
२५ वर्षीय फिर्यादी महिला ही जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा येथील रहिवासी आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चौक मंडई येथे लॉजमध्ये असताना पीडित महिलेच्या पतीचे मामा अल्ताफ अहमद मिलू (रा. उफाडा हो मनिगाह, ता. जि. कूपवाडा, जम्मू-काश्मीर) याने फिर्यादी महिलेस भीक न मागण्यास सांगितले; मात्र तिने नकार फु दिला. याचा राग आल्याने आरोपी य अल्ताफ मिलू याने पीडितेला मारहाण प्र करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, वि असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV